पाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज
पाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज – Marathisrushti Articles पाकिस्तान मध्ये चीनी व्हायरसचे थैमान आणि भारत लष्करप्रमुखांकडून पाकिस्तानची निंदा भारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी लढत असताना पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करण्यात येत असल्यावरून लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी तीव्र शब्दांत निंदा केली. या कठीण प्रसंगातही पाकिस्तानने आपल्या वृत्तीत किंचितही बदल केलेला नाही. हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा... जनरल नरवणे म्हणाले की, कोरोना संक्रमणामुळे जगातील सगळेच देश या विषाणूविरोधात लढा देत आहेत. पण पाकिस्तानने याही स्थितीत आपल्या कारवाया करणे सुरूच ठेवले आहे. या कठीण प्रसंगात भारत जगातील इतर देशांना वैद्यकीय स्वरुपाची मदत करतो आहे. औषधे, वैद्यकीय साधने निर्यात करण्यात येत आहेत. पण दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून दहशतवाद निर्यात करण्याचे काम वेगाने सुरूच आहे.काश्मीर खोऱ्यातील केरान...